२३ जाने, २००९

माझा गाव

मनकोन्यात दडलय गाव
सागरलाटांवर डुलतेय नाव

माडांच्या पानात
सुरुच्या रानात
वार्‍याची गाणी
घुमती कानात
देवळाच्या घंटेत श्रद्धाभाव
सागरलाटांवर डुलतेय नाव


पाउलवाटेवर
धुळीशी कुस्ती
बैलगाडीतील
मित्रांशी मस्ती
पावसाच्या सरीत भिजलाय गाव
सागरलाटांवर डुलतेय नाव

चमचमत्या वाळूत
ओलीशी पावल
आबांच्या राईत
आभाळ मावल
आजीची हाक घेते काळजाचा ठाव
सागरलाटांवर डुलतेय नाव

1 टिप्पणी:

  1. नमस्कार प्रतिमा जी

    खूप खूप खूपच छान तुमच गाव
    मला तर फारच आवडल
    जणू काही मी पुन्हा माझ्या गावातच उभा आहे..
    त्याच देवराई समोर... त्याच मंदिरा समोर
    त्याच त्या नदीत उड्या मारतोय
    त्याच त्या वादाच्या पारंब्यांचा उंच उंच झोका घेतोय
    क्षणापुरता मी माझ्या गावातच होतो...
    खूपच छान लिहिलात तुम्ही
    मला तुमचा ब्लॉग खूपच आवडला.......................

    गणेश पावले( मुंबई)

    उत्तर द्याहटवा